‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

नोमॅडलँड



जेसिका ब्रुडर यांच्यानोमॅडलँड : सर्व्हायव्हिंग अमेरिका इन ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरीया पुस्तकावर नोव्हेंबर २०२०मध्येनोमॅडलँडहा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात डिस्ने हॉट स्टारवर तो उपलब्ध आहे. त्याला २०२०चा उत्कृष्ट चित्रपट म्हणूनअकॅडमी अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. त्याचे दिग्दर्शन क्लोई झाओ यांनी केले आहे, तर मुख्य अभिनय फ्रान्सेस मॅकडरमंड यांनी केला आहे. या चित्रपटासाठी त्यांनाही उत्कृष्ट अभिनयाचेअकॅडमी अवॉर्डमिळाले आहे. फ्रान्सेस मॅकडरमंड यांचे हे चौथे अकॅडमी अवॉर्ड आहे.

नोमॅडलँडहा अमेरिकेतील कार (व्हॅन)मध्ये वास्तव करणाऱ्या भटक्या लोकांची अवस्था दाखवणारा चित्रपट आहे. २०११ साली एम्पायर या नेवाडा प्रांतातील शहरामध्ये जिप्समचे खाणकाम बंद पडले. संपूर्ण शहरामधील रहिवाश्यांना आपले घरदार सोडून कामासाठी भटकावे लागले. २०११मध्ये हे शहर पूर्णतः ओसाड पडले. ही सत्य घटना आहे.


या चित्रपटातील मुख्य पात्रफर्नही ६० वर्षांची वृद्ध विधवा महिला आपले एम्पायरमधील घर सोडून व्हॅनमधून भटकू लागते. अ‍ॅमेझॉन कंपनी, हॉटेल्स, मिल्स इत्यादी ठिकाणी रोजंदारीवर काम करू लागते. गाडी कशीबशी रात्री पार्क करून प्रचंड गारठ्यात ती व्हॅनमध्ये राहते. तिचे उजाड झालेले आयुष्य आणि तिची भटकंती, याचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.


अमेरिकेतील तिच्यासारखेचनवीन भटकेलोक ऍरिझोनाच्या वाळवंटात एका ठिकाणी शिबिरास एकत्र येत असतात. ही शिबिरे बॉब वेल्स नावाची व्यक्ती आयोजित करत असते. यु-ट्युबच्या माध्यमातूनदेखील तो मार्गदर्शन करत असतो. हिवाळ्यामुळे कुठेही काम मिळत नसल्याने आणि प्रचंड गारठा असल्याने फर्न त्या शिबिराला जाते. बॉबच्या मते ही भांडवली व्यवस्था आपल्याला घोड्याप्रमाणे राबवून घेते आणि वेळ आली की, कुरणाबाहेर फेकून देते. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन एकमेकांची काळजी घ्यायला हवी, एकत्र यायला हवे. या शिबिरात लोक आपापली दुःखे व्यक्त करतात. भटके जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने जगायला हवे, यावर चर्चा करतात. टायरचे पंक्चर कसे काढावे, गरजेच्या कोणत्या वस्तू जवळ असाव्यात, लपूनछपून गाडी कशी पार्क करावी, एकूणच आपली घाण आपण कशी काढावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबीर आयोजित केलेले असते.

फर्नला शिबिरात डेव्ह नावाचा एक माणूस भेटतो. त्याच्यासोबत तिचा परिचय वाढतो. पण जेव्हा ती डेव्हच्या घरी जाते, तेव्हा तिला त्या सुसज्ज व्यवस्था असणाऱ्या घरात झोप लागत नाही. ती मध्यरात्रीच उठून आपल्या व्हॅनमध्ये जाऊन झोपते आणि सकाळी प्रवासाला निघते. कारण कुणावर अवलंबून राहणे किंवा बळजबरी घर करणे, तिला पसंत नसते. ‘घरया शब्दाचा अर्थ तिला पूर्णतः समजलेला असतो.


एका दृश्यामध्ये फर्नला तिची भाची एका शॉपमध्ये भेटते. ती विचारते की, ‘तुला घर नाहीये, असं समजलं.’ त्यावर फर्न म्हणते, ‘मला घर (Home) आहे, पण निवासस्थान (House) नाहीये.’ फर्नच्या या संवादातूनघरआणिनिवासया किती विभिन्न संकल्पना आहेत, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. पुढे पैशांच्या अडचणीपोटी ती बहिणीच्या घरी जाते. तिथे रिअल इस्टेटवर गप्पा सुरू असतात. तेव्हा ती म्हणते, ‘तुम्ही भांडवलदार लोकांना घर नावाची खोटी अपेक्षा दाखवून कर्जबाजारी करता.’


एकूणच भांडवली व्यवस्थेवरील तिची नाराजी आणि किमान गरजा यासंबंधीचे तिचे मत अतिशय महत्त्वाचे वाटते. नाईलाजास्तव आलेलेनो मॅडजीवन तिला कशा पद्धतीने सवयीचे होते आणि परावलंबी राहता नवीन स्वातंत्र्याचा ती कशा पद्धतीने स्वीकार करते, हे या चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे.


हा चित्रपट अमेरिकेतील भटक्या लोकांचे आयुष्य पडद्यावर आणतो. बेरोजगारी, मंदी, वृद्धांची पेन्शनची समस्या, उदध्वस्त झालेली कुटुंब व्यवस्था, अशा अनेक समस्या अमेरिकेतील दुर्लक्षित भागांत आहेत. ज्या परिस्थितीकडे अमेरिकन व्यवस्थेने कधीही पाहिलेले नाही. ‘नो मॅड लँडच्या माध्यमातून एका वेगळ्या अमेरिकेचे चित्र समोर आले आहे.


नो मॅडजगण्यात असलेल्या स्वातंत्र्यामुळे ते किती समृद्ध आहे, असे म्हणणे म्हणजे दारिद्र्याचे उदात्तीकरण करणे होय, अशी टीका या चित्रपटावर/कादंबरीवर केली गेली. तरीही भांडवली महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील हेनो मॅडदृश्य नजरेआड करता येणार नाही. पूर्वी अमेरिकेतील लोकनो मॅडआयुष्यच जगत होते आणि फर्न ही एकप्रकारे अमेरिकन परंपरा चालवत आहे, असे तिची बहीण एकदा म्हणते.


पण अलीकडच्या भांडवली व्यवस्थेच्या काळात लोकांना नाईलाजास्तवनो मॅडव्हावे लागते आहे, ही फार वेगळी बाब आहे. त्यामुळे हा चित्रपट एकीकडेनो मॅडआयुष्य दाखवत असताना भांडवली व्यवस्थेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे करतो. त्यामुळे पूर्वीचेनो मॅडजगणे आणि २१व्या शतकातील दुष्ट व्यवस्थेमुळे पदरी पडलेलेनो मॅडजगणे, यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. याला आपणआधुनिक नो मॅडदेखील म्हणू शकतो.


अकॅडमी अवॉर्डमध्ये नेहमी भांडवली व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या आणि अमेरिकन (पाश्चिमात्य) मूल्यव्यवस्था कशी श्रेष्ठ आहे, हे दाखवणाऱ्या चित्रपटांनाच सन्मान मिळतो, असे आरोप नेहमीच होत आले आहेत. पण २०१५चाअकॅडमी अवॉर्डविजेतास्पॉटलाईटअमेरिकेतील बोस्टन शहरातील चर्चमधील फादर लहान मुलांचे शारीरिक शोषण कसे करतात, यावर आधारलेला चित्रपट होता. आणि २०२०मधीलनोमॅडलँडहा याच अमेरिकेतीलनो मॅडलोकांच्या आयुष्यावरील आधारलेला आहे. या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या पुरस्कारांमुळेअकॅडमी अवॉर्डची विश्वासार्हता वाढली आहे, असे वाटते.


या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय करणाऱ्या दोघीही महिला असल्या तरी तो काही स्त्रीवादी नाही, पण त्याची कथा एका स्त्रीच्या नजरेतून मांडल्यामुळे विषयाची व्याप्ती निश्चितच वाढते. चित्रपटाची पटकथा वेगवान नाही, तसेच त्यात प्रेक्षकांना चकित करणारी दृश्येदेखील नाहीत. हा चित्रपट म्हणजे एक भटकंती आहे. प्रवास आहे. त्यामुळे केवळ पाहण्यापेक्षाही तो अधिक अनुभवावा असा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘कुरुमावतार’

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…