पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

‘डी’कपल्ड’

इमेज
  नुकतीच ‘नेटफ्लिक्स’वर ‘ ‘डी’कपल्ड’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. तिचं दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी आणि लेखन मनू जोसेफ यांनी केलं आहे. यातील मुख्य भूमिका आर. माधवन आणि सूरवीन चावला यांच्या. डी’कपल्ड म्हणजे एक प्रकारे डिव्होर्स असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं, पण ही संकल्पना टोकाचं किंवा विकृत वर्तन म्हणून समाजात रुळलेली आहे. ‘डिव्होर्स’चं मराठीत भाषांतरदेखील फार भयंकर आहे- ‘घटस्फोट’. म्हणजे बॉम्ब फुटावा वा फोडला जावा असं काहीतरी. मात्र डी’कपल्ड हा घटस्फोटाचा एक सौम्य प्रकार समजला जातो. त्याचा अर्थ होतो, केवळ पती-पत्नी या नात्यातून फारकत घेऊन कोणताही द्वेष, घृणा न बाळगता मैत्रीपूर्वक राहणं आणि आपल्या मुलाबाळांवर होणाऱ्या मानसिक आघातांपासून त्यांचं रक्षण करणं. तर या वेबसिरीजची कथा थोडक्यात अशी आहे. आर्या (माधवन) आणि श्रुती (सुरवीन) हे गुडगावमध्ये राहणारं एक जोडपं. आर्या चेतन भगतनंतरचा इंग्रजीतला नावाजलेला लेखक असतो, तर सुरवीन असते इन्व्हेस्टमेंट बँकर. आर्याचं लिखाण आणि त्याचं वर्तन एकदम सुसंगत असतं. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणं, प्रश्न विचारणं या एकंदर व...

जय भीम!

इमेज
‘जय भीम’ हा टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेला तमिळ सिनेमा नुकताच ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला आहे. कथा पूर्णतः सत्य घटनांवर आधारलेली आहे. सिनेमाचा कालावधी साधारण १९९३ ते १९९५ या दरम्यानचा आहे. म्हणजेच जयललिता यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा कालावधी. या काळात पोलिसांकडून आदिवासींवर अमानुष पद्धतीनं अत्याचार होत होते. सर्व प्रकारचे कायदेशीर अधिकार नाकारत अनेक आदिवासींना तुरुंगात डांबलं जात होतं. अशा व्यवस्थेविरोधात लढा देणारे उच्च न्यायालयाचे वकील चंद्रू हे या सिनेमाचे नायक आहेत. त्यांनी १९९३पासून हजारो आदिवासी, दलितांना कायदेशीर पद्धतीनं न्याय मिळवून देण्याचं काम अविरत केलं. तसंच तमिळनाडूमधील कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. या सिनेमाचा विषय चंद्रू यांच्या लढ्यातील एक महत्त्वाचा खटला आहे. इरुलर आदिवासी जमातीतील एक शोषित स्त्री (संगेनी), तिचा नवरा (राजकन्नू) आणि संबंधित कुटुंबीयांची ही कथा आहे. इरुलर आदिवासी जमात ही तमिळनाडूमधील एक उपेक्षित आणि शोषित जमात आहे. अनेक वर्षांपासून चोरी करणं हा त्या समुदायाचा गुणधर्म आहे, असं समजून आजच्या काळातदेखील त्यांन...