पोस्ट्स

‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…

इमेज
गांधी आणि इंग्रजी सिनेमा रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी १९८२ साली गांधींच्या जीवनावर सिनेमा काढला. त्याला एकूण आठ ऑस्कर मिळाले. हा सिनेमा जगभर गाजला. हॉलिवुड आणि परकीय भाषेत पुढे गांधींचा विचार सतत दिसला. २००७ साली ‘द ग्रेट डिबेटर्स’ हा डेंझिल वॉशिंग्टन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आला. त्याचा काळ १९३५चा आहे. याची कथा सत्यघटनेवर आधारलेली आहे. अमेरिकेतील टेक्ससमध्ये वायली या नावाचे निग्रो मुलांचे एक छोटे महाविद्यालय असते. तिथं एक नवीन शिक्षक येतात आणि विद्यार्थ्यांची ‘डिबेट टीम’ तयार करतात. ही टीम स्पर्धेत उतरते, एकेक टप्पा पार करत अंतिम सामन्यात पोचते. अमेरिकेत निग्रो विद्यार्थ्यांची पहिलीच टीम अंतिम सामन्यात पोचते. तिथे सामना होतो हार्वर्ड विद्यापीठाच्या (गोऱ्या) विद्यार्थ्यांसोबत. अंतिम डिबेट सुरू होते. ही डिबेट ‘हिंसा विरुद्ध अहिंसा, सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता, कायदा विरुद्ध सविनय कायदेभंग’ अशी बनते. निग्रो विद्यार्थी अहिंसा, असहकार, सहिष्णुतेच्या बाजूने असतात; तर गोरे विद्यार्थी कायदा, सुव्यवस्था आणि कायद्याचा अंमल राखण्यासाठी हिंसा गरजेची असते, म्हणजेच अनागोंदी होऊ नये,...

नोमॅडलँड

इमेज
जेसिका ब्रुडर यांच्या ‘ नोमॅडलँड : सर्व्हायव्हिंग अमेरिका इन ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी ’ या पुस्तकावर नोव्हेंबर २०२०मध्ये ‘ नोमॅडलँड ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला . भारतात डिस्ने हॉट स्टारवर तो उपलब्ध आहे . त्याला २०२०चा उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘ अकॅडमी अवॉर्ड ’ ने गौरवण्यात आले आहे . त्याचे दिग्दर्शन क्लोई झाओ यांनी केले आहे , तर मुख्य अभिनय फ्रान्सेस मॅकडरमंड यांनी केला आहे . या चित्रपटासाठी त्यांनाही उत्कृष्ट अभिनयाचे ‘ अकॅडमी अवॉर्ड ’ मिळाले आहे . फ्रान्सेस मॅकडरमंड यांचे हे चौथे अकॅडमी अवॉर्ड आहे . ‘ नोमॅडलँड ’ हा अमेरिकेतील कार ( व्हॅन ) मध्ये वास्तव करणाऱ्या भटक्या लोकांची अवस्था दाखवणारा चित्रपट आहे . २०११ साली एम्पायर या नेवाडा प्रांतातील शहरामध्ये जिप्समचे खाणकाम बंद पडले . संपूर्ण शहरामधील रहिवाश्यांना आपले घरदार सोडून कामासाठी भटकावे लागले . २०११मध्ये हे शहर पूर्णतः ओसाड पडले . ही सत्य घटना आहे . या चित्रपटातील मुख्य पात्र ‘ फर्न ’ ही ६० वर्षांची वृद्ध विधवा महिला आपले एम...

‘मंडेला’

इमेज
‘ मंडेला ’ हा तमिळ सिनेमा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘ नेटफ्लिक्स ’ वर प्रदर्शित झाला आहे . तो मडोने अश्विन यांनी दिग्दर्शित केलाय . त्यातली प्रमुख भूमिका योगी बाबू यांची आहे . ग्रामीण भागातील जातीय राजकारण आणि निवडणूक यावर आधारित हा व्यंग - सिनेमा आहे . त्याची कथा आहे तमिळनाडूमधील सुरंगुंडी नावाच्या एका गावची . त्याचे जातीच्या आधारावर उत्तर सुरगुंडी आणि दक्षिण सुरगुंडी असे दोन भाग पडलेले असतात . या दोन विभागांत जोराचा जातीय संघर्ष असतो . तोच संघर्ष राजकारणातदेखील दिसतो . हा अनेक वर्षांचा संघर्ष थोपवून ठेवण्याचे काम गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सरपंच पेरिया अय्या करत असतात . त्यासाठी त्यांनी दोन विवाह केलेले असतात . एक बायको दक्षिण सुरगुंडीमधून , तर दुसरी उत्तर सुरगुंडीमधून . या क्लृप्तीने त्यांनी गावात जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो . मात्र ते थकतात , तेव्हा त्यांच्याच दोन मुलांमध्ये जोराचा   संघर्ष   सुरू होतो . एक मुलगा दक्षिण सुरगुंडीमधून उभा राहतो ...