‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

'कन्नथिल मुथमित्तल आणि ‘नाळ’


अमूधाऊम अनाऊमया तमिळ लघुकथेवर आधारित ‘‘कन्नथिल मुथमित्तल’’ हा चित्रपट मनी रत्नम यांनी २००२ साली बनवला. ही कथाअमुधाया गोंडस मुलीची आहे.

९० च्या दशकात श्रीलंका आणि तमिळ या भाषिकांमधील जोराचा संघर्ष सुरू असतो. तेव्हा तमिळ भाषिक असलेले शामा (नंदिता दास) आणि दिलीपान (जे. डी. चक्रवर्ती) यांचं लग्न होतं. काही काळानंतर श्रीलंकेतील सैन्य दिलीपानला मारून टाकतं, कारण तो तमिळ भाषिकांच्या छुप्या कारवाईत सामील असतो. मुळात त्यांना अपत्य नको असतं, इतकं भयाण वास्तव सिलोनमध्ये निर्माण झालेलं असतं. तेव्हा आपला जीव वाचवत गरोदर असलेलीशामाभारतात येते. तिथं ती अमुधाला जन्म देते. तिला अनाथाश्रमात सोडून ती परत आपल्या कामगिरीवर जाते.

पेशानं लेखक असलेलाथिरू’ (आर. माधवन) त्या अनाथ पडलेल्या अमुधाला दत्तक घेण्याचा विचार करतो. पण तो अविवाहित असल्यानं अनाथाश्रम त्यास नकार देतं. मग तो घाईघाईनं इंदिराशी लग्न करतो. आणि लग्न झाल्याबरोबर अमुधाला अनाथाश्रमात जाऊन दत्तक घेतो. पुढे एका सुंदर आयुष्याची सुरुवात होते. अमुधा मोठी होते, तिला थिरू समजावून सांगतो की, तिची खरी आई कोणीतरी वेगळी आहे. अमुधाची मूळ आईला भेटण्याची धावपळ सुरू होते. तिच्या कोवळ्या मनात मूळ आईची आस लागून राहते. थिरू आणि इंदिरा संयमानं घेऊन तिची तिच्या आईशी भेट घालण्याचा प्रवास सुरू करतात...

अमुधाला तिच्या आईशी भेटवण्यासाठी चाललेला थिरू आणि इंदिराचा प्रवास अशाच दहशतीच्या परिस्थितीत असलेल्या सिलोनपर्यंत पोचतो. तिथं अमुधाची भेट आपल्या मूळ आईशी, शामाशी होते आणि तेव्हा आईनं तिला एकटं का सोडून दिलं हे समजतं. अमुधाला सोडून देऊन शामा  श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांना सामील झालेली असते. तेथील तमिळ नागरिकांच्या हक्कासाठी तिनं संघर्षाचा मार्ग निवडलेला असतो. नवी जन्माला येणारी मुलं मोकळ्या हवेत श्वास घेतील यासाठी तिनं आपल्या पोटच्या जीवाचा त्याग केलेला असतो. शामा अमुधाला भेटल्यानंतर तिच्या मायेचा पाझर फुटतो, पण ती ध्येयापासून डगमगत नाही. अमुधाला परिस्थितीची जाणीव होते. तिला तिच्या दोन्ही आईंशीनाळघट्ट झाल्याची अनुभूती येते

मुलाची दोन्ही आईंशीनाळघट्ट ठेवण्यात यशस्वी झालेला हा चित्रपट मनी रत्नम यांनी अतिशय भावनिक आणि सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन निर्माण केला आहे. मूळ आईचं मुलीला सोडणं, एका युवकानं त्या अनाथ मुलीला स्वीकारणं आणि त्याच्या पत्नीनं पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करणं... एकंदरीत कथेतील सर्व पात्रं अनेक अंगानं क्रांतिकारक भूमिकेत आहेत. त्यामुळे हा चित्रपट कमालीचा बनतो

अशाच आशयाचा मराठीनाळमात्र वरवरचा, पोकळ आणि सामाजिक जाणिवांची उणीव असलेला केवळ कौटुंबिक ड्रामा वाटतो. ‘नाळएक चित्रपट म्हणून फारसा सरस ठरत नाही. चित्रपटातील भूमिका साजेशा असल्या किंवा पटकथा सुंदर असली तरी ती भावनात्मकदृष्ट्या मराठी चित्रपटांचीमूळनाळ तोडण्यात यशस्वी ठरत नाही. कारण केवळ भावनांवर आधारित राहून बदलतं सामाजिक संदर्भ आणि बदलता काळ पकडता येत नाही. खरं म्हणजे त्याचा आवाकाच लक्षात येत नाही.

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘कुरुमावतार’

नोमॅडलँड

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…