‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

वेबसिरीज आणि सेन्सॉरशिप




जुलैमध्येनेटफ्लिक्सही व्हिडिओ ऑन डिमांडची निर्मिती करणारी कंपनी भारतातसेक्रेड गेम्सही आपली पहिली वेबसिरीज घेऊन आली. त्याआधीब्रिथही सिरीज अॅमेझॉन प्राईमनं आणली होती, पण ती प्रेक्षकांपर्यंत तितकीशी पोहचू शकली नाही. त्यामुळे वेबसिरीज म्हणून भारतात पहिलं यश मिळवलं तेसेक्रेड गेम्सनं. आणि त्याच निमित्तानं नेटफ्लिक्सनं भारतात दमदार एन्ट्री केली

नेटफ्लिक्स ही वेबसिरीज बनवणारी एक जागतिक कंपनी असून तिनं बऱ्याच वेबसिरीज बनवल्या, पण तिला पहिलं यश मिळालंनार्कोसया वेबसिरीजमुळे.

चित्रपटांच्या दुनियेत गुन्हेगारीवर आधारित एखाद्या सर्वोत्तम चित्रपटाचं नाव घ्यायचं झालं, तर अगदी सहजतेनंगॉडफादरचं घ्यावं लागेल. आणि वेबसिरीजच्या दुनियेतलं नावं घ्यायचं झालं तर तेनार्कोसचं असेल. यानार्कोसनं जगाला भुरळ घातली. आणि व्हिडिओ ऑन डिमांडच्या जगतामध्ये नेटफ्लिक्सगॉडफादरबनली!

चित्रपटांच्या कथांमध्ये जे मुख्य प्रकार आढळून येतात, ते म्हणजे विनोदी, अॅक्शन, प्रेमकथा, शोकांतिक कथा, गूढकथा, गुन्हेगारी इत्यादी. त्या प्रकारांमध्ये पुढे वेगळे उप-प्रकार असतात. पण त्या अनेक अंगांपैकी नव्या पिढीला गुन्हेगारी आणि त्यातून कथेतील नायकाला आलेली अचानक श्रीमंती दाखवणाऱ्या चित्रपटाबद्दल विशेष आकर्षण असतं. हिंदीतील उदाहरणं द्यायची झाली तरदिवारतेदयावानते अलीकडचाजन्नत.

तसं पाहिलं तर प्रत्येक गुन्हेगारीपटाचं मूळ एकच असतं, ते म्हणजेसेवन बेसिक प्लॉट्सया कादंबरीतील बुकर यांच्या नियमातीलरेग टू रीचेसमध्ये फिट बसतं. त्यामुळे अशीच थीम घेऊन नेटफ्लिक्स जगासमोर आली, तिनंनार्कोसही वेबसिरीज लाँच केली. तेव्हा तिला जगभरातून प्रतिसाद मिळाला.

वेबसिरीज हे युवकांपर्यंत लवकरात लवकर पोचणारं मोठं माध्यम म्हणून जगासमोर आलं, याचं दुसरं कारण म्हणजे रोज जास्तीत जास्त डेटा देणाऱ्या सर्विस प्रोव्हायडर कंपन्या. जगभरात डेटा स्वस्त देणाऱ्या कंपन्या अस्तित्वात होत्या, पण भारत अजूनहीकमी डेटा महाग दरातदेत होता. त्यामुळे व्हिडिओ ऑन डिमांडवर आधारित कंपन्यांना भारतात हवा तसा वाव नव्हता. मात्र अचानक रिलायन्ससारख्या कंपनीनंजिओया डेटा सर्विसचं उदघाटन करून नेट प्रोव्हाडिंग जगतात धुमाकूळ घातला आणि स्वस्तात स्वस्त काही महिने तर चक्क मोफत डेटा द्यायला सुरुवात केली. दररोज दीड जीबी डेटा माफक दरात द्यायला सुरुवात केली, तेव्हा नेटफ्लिक्सच्या सीईओनं जिओ सर्विस प्रोव्हायडरचे आभार मानले होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे वाढत्या वेबसिरिजच्या प्रभावामागे नेट डेटा प्रोव्हायडरचासुद्धा मोठा सहभाग आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

नार्कोसही नेटफ्लिक्सवर गाजलेली पहिली वेबसिरीज. गुन्हेगारी दर्शवणारी सर्व कथानकं कुठेतरीगॉडफादरला स्पर्श करून जातातच. पण मग चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये फरक काय? तरकथनाचं स्वरूप’. वेबसिरीजमध्ये कथनाला जो फायदा होतो, तो चित्रपटातून होत नाही. चित्रपटाला एक चौकटीत सर्व काही कोंबावं लागतं, पण वेबसिरीज संयमानं, शिस्तीत आणि नेमकेपणानं कथन खुलून सांगते. पटकथा हळुवार पुढे सरकत राहते. वेळेच्या बंधनापासून मुक्त राहते. त्यामुळे आजगॉडफादरहा चित्रपट जर वेबसिरिज रूपात आणायचा ठरला, तर त्याचेनार्कोसपेक्षा अधिक सिझन्स तयार होतील.

नार्कोसकिंवा त्यासमान इतर गोष्टी भारतात येण्याचा मुख्य अडसर म्हणजे सेन्सॉरशिप. चित्रपटांच्या बाबतीत आपण नेहमीच सेन्सॉरशिपचा पेच अनुभवला आहे. सेन्सॉरशिप कलाकाराला त्याच्या कलेपासून वंचित ठेवते. नेमके वेबसिरीजवाले या कात्रीतून बाहेर पडले आणि भारतात नेटफ्लिक्सनंसेक्रेड गेम्सआणली. ती सेन्सॉरशिपला धुडकवत समोर आली. कारण वेब कंटेंट अजून कायद्याच्या कचाट्यात नाही. त्यामुळे चित्रपटविश्वातील कलाकारांना वेबसिरीजच्या माध्यमातून मिळालेलंसेक्रेड गेम्सहे पहिलंच स्वातंत्र असावं. आणि याचमुळे शिव्या, हिंसा, अश्लीलता, व्यसनं हे खुलेआम दाखवण्याचं स्वातंत्र्य मिळालं. ‘सेक्रेड गेम्सचे दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी त्या स्वातंत्र्याच्या पूर्ण फायदा उचलत संबंध कला क्षेत्रात धुमाकूळ घातला. इंदिरा गांधींच्या आणीबाणीपासून ते शहाबानू केसपर्यंत अनेक गोष्टींवर जोरदार टीका टिप्पणी करत आणि बाबरी मशिदीच्या विध्वंसचा उल्लेख मध्यभागी ठेवून सबंध भारतातील गेल्या पंचवीस वर्षांतील राजकारणावर, गुन्हेगारीवर, समाजावर अर्वाच्च भाषेत टीका करणाऱ्या या वेबसिरीजनं मोठ्या प्रमाणावर यश कमावलं

सेक्रेड गेम्सच्या यशानंतर वेबसिरीजचं गारूड भारतीय लोकांवर आरूढ होऊ लागलं आहे. अशा काळात अॅमेझॉननं तरी का मागे राहावं? मग अॅमेझॉनप्राईमघेऊन आलीमिर्झापूर’. ‘सेक्रेड गेम्सही राजकारण, गुन्हेगारी आणि समाज या तिन्ही गोष्टी एकत्र घेऊन एका मोठ्या चौकटीत पुढे येत असली तरीनार्कोसप्रमाणे हळुवार आणि शिस्तीत जात नाही. या उणिवा भरून काढत अॅमेझॉननंमिर्झापूरबनवली. म्हणूनमिर्झापूरहीसेक्रेड गेम्सपेक्षाही वेगळी बनते आणिनार्कोसच्या जवळ पोचते. कारण जो फायदानार्कोसनं वेबसिरीजमधून उचलला, तोमिर्झापूरनंही उचलला. तो म्हणजे हळुवार आणि शिस्तीचं कथन

गेली अनेक दशकं चित्रपटकला सेन्सॉरच्या कात्रीत आहे. याच सेन्सॉरशिपमुळेवॉटरहा दीपा मेहता यांचा सिनेमा ऑस्करसाठी कॅनडाकडून पाठवावा लागला. आणि फॉरेन लँग्वेजमध्ये नॉमिनेटदेखील झाला. हे भारतीय सेन्सरशीपचं यश मानावं की..?

वात्स्यायानानं कामसूत्र जगाला दिलं आणि ते सूर्यमंदिरावर कोरलंदेखील गेलं, पण चित्रपटांत इतर कलांत त्याचा खुल्यानं उल्लेख करण्याचं स्वातंत्र्य हरवलेला समाज या नव्या माध्यमांमुळे हादरून गेला.

सेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘कुरुमावतार’

नोमॅडलँड

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…